Friday, July 5, 2013

बृहन्मुंबई महानगरपालिका



बृहन्मुंबई महानगरपालिका
   मेजावरुन                                    दिनांक २६.०६.२०१३
कृपया त्वरित प्रसिद्धीसाठी
मोबाईल टॉवर धोरणासंदर्भात महापौरांकडे सादरीकरण
     बृहन्मुंबई महानगरपालिका मोबाईल टॉवर संदर्भात निश्चित करित असलेल्या धोरणामध्ये मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊनच मोबाईल टॉवर संदर्भातील आपले धोरण मंजूर करेल, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर श्री. सुनिल प्रभु यांनी केले.
व्ही. सिटीझन्स् ऍक्शन नेटवर्क व इंडियन्स् फॉर सेफ इनव्हॉरमेंट  या संस्थातर्फे मोबाईल टॉवरमधून निघणाऱया रेडिएशनच्या दुष्परिणामाबाबत महापौर दालनात आज (दिनांक २६ जून, २०१३) सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करताना महापौर बोलत होते.
          मोबाईल टॉवर धोरणासंदर्भात बोलताना महापौर म्हणाले की, केंद्रसरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ट्रस्टी ने (DOT)  मोबाईल टॉवर संदर्भात जे धोरणनिश्चित केले आहे, त्या धोरणाचा अंतर्भाव आपल्या धोरणात करुन बृहन्मुंबई महापालिका आपले धोरण निश्चित करणार आहे. मुंबईकर नागरिकांच्या आरोग्यहिताच्या संदर्भात केंद्रसरकारला महापौर या नात्याने एक पत्र लिहणार असल्याचे महापौर श्री. सुनिल प्रभु यावेळी म्हणाले. या पत्रात आज आपल्या संस्थाकडून ज्या सूचना प्राप्त झाल्या त्यांचा निश्चितच  अंतर्भाव करण्यात येणार असल्याचे महापौर यावेळी म्हणाले.  त्यासोबतच मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीने धोरणाचा मसुदा महापालिका सभागृहात लवकरच सादर करण्याची सूचना महापौरांनी यावेळी संबधित विभागाला केली. संबधित विभागाकडून सभागृहात संबधित धोरणाच्या मसुदावर चर्चा करुन धोरण मंजूर करण्यात येणार असल्याचे महापौर यावेळी म्हणाले. सभागृहात धोरण निश्चित झाल्यानंतरही डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन ट्रस्टीकडून आणखी काही महत्वपूर्ण सूचना प्राप्त झाल्या तर त्यांचासुध्दा अंतर्भाव या धोरणात करण्यात येणार असल्याचे महापौर यावेळी म्हणाले.
     याप्रसंगी सभागृह नेते श्री. यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. राहुल शेवाळे, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. असीम गुप्ता, प्रमुख अभियंता (विकास व नियोजन) श्री. राजीव कुकनुर, व्ही. सिटीझन्स् ऍक्शन नेटवर्कच्या श्रीम.इंद्रानी मलकानी, इंडियन्स् फॉर सेफ इनव्हॉरमेंटचे श्री. प्रकाश मुन्शी व श्रीम. रोहिता दोशी उपस्थित होत्या.

 



***

No comments:

Post a Comment